शिवाजी फौंडेशन

Trans_Rajmudra-1

आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी घडतो तो त्याच्या विचारामुळे, माणसाचे विचार घडतात ते त्याच्या गुरूमुळे, म्हणून एका चांगल्या गुरुची निवड करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे पुस्तके हेच माणसांचे सर्वोत्तम गुरु आहेत. आजच्या या पिढीला माणसाला वाचनाचे आणि अभ्यासाचे महत्व खूप कमी झाले आहेत, आणि म्हणूनच त्यांना वाचनाचे फायदे तसेच महत्व पटवून दिले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज

भारताचा दूरदृष्टी असलेला धर्मनिरपेक्षी महान राजा.

मराठा साम्राज्याची स्थापना करणारे आणि त्यांच्या काळातील  तसेच आत्तापर्यंतच्या सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असे   “छत्रपती शिवाजी महाराज (१६३० – १६८०)”.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याने विजापूर च्या आदिलशाही सलतनतेच्या  घटनेतून परकीय मुलुख जिंकला आणि तोच पुढे जाऊन मराठी साम्राज्याचा पाया झाला. राज्य स्थापित केल्या नंतर शिस्थबद्ध लष्कराच्या मदतीने एक सक्षम आणि प्रगतिशील प्रशासन राबविले. 

छत्रपती शिवाजी महाराज हे आजपर्यंतचे सर्वात धाडसी, प्रगतशील आणि जाणते शासक होते. त्यांनीच सर्वप्रथम नौदलाच्या ताकदीचे महत्व जाणले आणि कोकण बाजूने स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी रणनीतीकरित्या किनारपट्टीवर नौदल व किल्ले स्थापन केले.शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

राजमाता जिजाऊ

द मदर ऑफ ऑल गुरुज.

जिजाबाई (१५९८ – १६७४) ह्या भारतातील सार्वत यशस्वी आणि नावाजलेले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई. राजमाता जिजाऊ यांची जिवनकथा हि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाइतकीच प्रेरणादाई आहे आणि हिंदुन्च्या इतिहासात त्यांना महत्वाच स्थान आहे.

जिजाबाई ह्या दृढनिश्चयी आणि प्रभावशाली महिला म्हणून ओळखल्या जातात. जिजाबाई ह्या स्वतःच कुशल योद्धा आणि व्यवस्थापक होत्या. त्यांनी त्यांचे कौशल्ये पुढे शिवाजी महाराजांना दिली ज्यामुळे त्यांच्यात कर्तव्य, धैर्य आणि कणखरपणा ह्या भावना उत्पन्न झाल्या.

आई जिजाउंनी आपलं आयुष्य हे आपल्या मुलाला घडवून एक आदर्श राजा बनावण्यात झोकून दिलं ह्या साठी छत्रपती शिवाजी महाराज नेहेमी त्यांचे ऋणी राहतील.

इतिहासाचा अभ्यास ही काळाची गरज

छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगात सर्वज्ञानी राजा म्हणून ओळखले जाते, पण आपणच आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष करतो आणि याच कारणामुळे आपण एवढे महान राष्ट्र असूनही आपण बुद्धीने अयशश्वी ठरलो आहोत. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास ही काळाची गरज झाली आहे

-प्रा.नामदेवराव जाधव

आत्ताच विकत घ्या